१. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेणे

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते. शिवपिंडीचे दर्शन घेतांंना भक्ताने शिवपिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे राहू नये किंवा बसू नये, तर नंदी अन् शिवपिंडी यांना जोडणार्या रेषेच्या बाजूला उभे राहून पिंडीचे दर्शन घ्यावे.
२. शिवालयात पिंडीची पूजा करणे

शिवालयात पिंडीची पूजा करतांना शाळुंकेच्या स्रोताच्या अगदी समोर बसू नये. याचे कारण म्हणजे शिवाच्या लहरी शाळुंकेच्या स्रोतातून अधिक प्रमाणात बाहेर पडतात. शाळुंकेच्या स्रोताच्या अगदी समोर बसल्यास शिवाच्या शक्तीशाली लहरी थेट अंगावर आल्याने उपासकाला त्या लहरींचा त्रास होण्याची शक्यता असते.
३. शिवाला बेल वहाणे
ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. यासाठीच शिवाला बेल वहावा.
४. शिवाला श्वेत रंगाची फुले वहाणे
धोत्रा, श्वेत कमळ, श्वेत कण्हेर, चमेली, मंदार, नागचंपा, पुन्नाग, नागकेशर, निशिगंध, जाई, जुई, मोगरा, तसेच श्वेत पुष्पे शिवाला वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार शिवाला १० फुले वहावीत. फुलांनंतर देठ आपल्याकडे ठेवून बेलाची पाने वहातात.
५. शिवपूजेसाठी वापरायच्या उदबत्ती
शिवाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता केवडा अथवा चमेली, यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात, तर शिवाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात.
६. शिवाला दुधाचा अभिषेक करणे
शिवाला दुधाचा अभिषेक करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
७. शिवपिंडीला प्रदक्षिणा घालणे
प्रदक्षिणा घालतांना डाव्या हाताने जायचे आणि अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी अर्थात् नहाळ (शाळुंकेचा पुढे नेलेला स्त्रोत) असते, तेथपर्यंत जाऊन तो न ओलांडता परत फिरायचे आणि पुन्हा पन्हाळीपर्यंत उलटे येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची. हा नियम शिवलिंग जर मानवस्थापित किंवा मानवनिर्मित असेल तरच लागू असतो; स्वयंभू लिंगास तसेच चल लिंगास (घरातील लिंगास) हा नियम लागू नाही. शाळुंकेच्या स्त्रोताला ओलांडत नाहीत, कारण तेथे शक्तीस्त्रोत असतो. तो ओलांडतांना पाय फाकतात आणि वीर्यनिर्मिती अन् ५ अंतस्थ वायू यांवर विपरीत परिणाम होतो. देवदत्त आणि धनंजय वायू आखडतात; मात्र ओलांडतांना स्वतःला आवळून ठेवले, म्हणजे नाड्या आखडल्या, तर परिणाम होत नाही.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !