‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे ‘फेसबुक’ आणि ‘यु ट्यूब’द्वारे थेट प्रक्षेपण !

जळगाव – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे ‘फेसबुक पेज’, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याचा फेसबुकच्या माध्यमातून ४ सहस्र ५००, तर ‘यु ट्यूब’च्या माध्यमातून ४ सहस्र जणांनी याचा लाभ घेतला.

सनातनचे ग्रंथ प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादन कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

परिषदेच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादन कक्ष उभारण्यात आला होता. येथे धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या परिषदेला महाराष्ट्रातून मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित, मंदिराशी संबंधित सेवा करणारे, तसेच अधिवक्ते उपस्थित होते. या कक्षाला सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हे पण वाचा :हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला प्रारंभ !