पाकिस्‍तानमध्‍ये महागाईमुळे हाहाःकार ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचे अभ्‍यासक

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

‘पाकिस्‍तानमध्‍ये महागाई कल्‍पनेच्‍या पलीकडे गेली आहे. तेथे धान्‍यापासून ते भ्रमणभाषसंचापर्यंत सर्वच किंमती अवाढव्‍य वाढत आहेत आणि महागाईचा दर हा २० टक्‍क्‍यांच्‍या पुढे गेला आहे. मागच्‍याच आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्‍या किंमती या २०० रुपयांच्‍या पार झालेल्‍या होत्‍या, तसेच गॅसच्‍या किंमतीही ५ सहस्रच्‍या पुढे गेल्‍या होत्‍या. अन्‍नधान्‍याच्‍या संदर्भातही हीच परिस्‍थिती आहे. गव्‍हाचे पीठही तेथे ३०० रुपयांजवळ पोचले होते. याखेरीज तेथे अन्‍नधान्‍याचा मोठा तुटवडाही निर्माण झालेला आहे. यामागे कारण, म्‍हणजे पाकिस्‍तानी रुपयाचे डॉलर्सच्‍या तुलनेत मोठे अवमूल्‍यन झालेले आहे.’

(साभार : फेसबुक)