कुठे वेदांमध्ये अंतर्भूत असलेल्या वैदिक शेतीविषयी संशोधन करणारी विदेशी विश्वविद्यालये, तर कुठे या ज्ञानाचा उपयोग न करता आधुनिक शेतीच्या मागे लागलेले नतद्रष्ट भारतीय !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘खत सिद्ध करणे आणि भूमीची उत्पादकता वाढवणे या विषयीची महत्त्वपूर्ण माहिती वेद-पुराणात आहे. भारतियांना मात्र या ‘वेदिक शेती’विषयी विसर पडला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसह अन्य विदेशी संस्थांमध्ये मात्र या शेतीविषयक माहितीवर संशोधन चालू आहे, असे प्रतिपादन कार्बन नैनो ट्यूबवर आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध लावणारे, तसेच बेल्जियम आणि फ्रान्समध्ये ३ वर्षे ‘थर्ड जनरेशन सोलर सेल’वर संशोधन करणारे श्री. समर्थ जैन (वय २६ वर्षे) यांनी केले. बेल्जियममध्ये शेतकऱ्यांना श्रीमंत मानले जाते, तर भारतात शेतकरी गरीब आहे. भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती पालटण्यासाठी श्री. समर्थ जैन हे जशपूर येथील शेतकऱ्यांना वैदिक शेती शिकवत आहेत.’

(दैनिक ‘सनातन प्रभात’, (३.६.२०१४))