नैसर्गिक शेतीला जनआंदोलन बनवूया ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘मां भारतीला रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यापासून मुक्त करूया’, तसा संकल्प करूया. जगाला स्वस्थ धरती यांचा मार्ग दाखवा. देशाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले. आत्मनिर्भर भारत तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा त्याची शेती आत्मनिर्भर बनेल. एक एक शेतकरी आत्मनिर्भर बनेल, असे तेव्हाच होईल, जेव्हा अनैसर्गिक खाद्य आणि औषधे यांच्या ऐवजी मां भारतीच्या मातीचे संवर्धन गोवर्धनने करू. नैसर्गिक तत्त्वांनी करू. आपण देशवासी प्रत्येक गोष्टीच्या हितासाठी आणि प्रत्येक जिवाच्या हितासाठी नैसर्गिक शेतीला जनआंदोलन बनवूया !