सुपीक माती’ (‘ह्मूमस’) कशी बनवावी ?

‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ तंत्रामध्ये ‘ह्मूमस’ला (नैसर्गिक पदार्थांचे विघटन झाल्यानंतर बनलेल्या सुपीक मातीला) पुष्कळ महत्त्व आहे. याविषयी माहिती पाहू.

१. शहरात सुपीक माती मिळणे कठीण असते आणि आगाशीलाही मातीचा भार होतो.

२. वाळलेले गवत, विघटनशील कचरा, पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या, स्वयंपाकघरातील ओला कचरा या सर्वांचे विघटन करून आपल्याला झाडांसाठीची ‘सुपीक माती’ बनवता येते.

३. मोठ्या झाडांचा पालापाचोळा, आंब्यांच्या पेट्यांतील वाळलेले गवत, घरातील विघटनशील कचरा, तसेच नारळाच्या शेंड्या या सर्वांचा वापर करून आपल्याला उत्तम प्रतीची सुपीक माती बनवता येते.

– एक कृषीतज्ञ, पुणे (८.१२.२०२१)