आकाशकंदिलाचा आकार सात्त्विक का हवा ?

१. चांदणीच्या आकाराचा कंदिल

या प्रकारच्या कंदिलातून चंचल स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारचा आकाशकंदिल बघणार्‍याच्या माध्यमातून लगेच मध्य भागातून, पाताळातून ऊर्ध्व दिशेस प्रक्षेपित होणारा तमोगुण खेचला जाऊन स्वतःच्या विशिष्ट आकाराच्या बलावर वातावरणात प्रक्षेपित होेतो.

२. षटकोनी आकाराचा कंदिल

या कंदिलातून समप्रमाणात तीन या घटकाशी संबंधित लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलाच्या सर्व ६ निगडित घटकांच्या सर्व ठिकाणी, बाजूस सतत तमोगुणी शक्तीचे प्रक्षेपण करणार्‍या यंत्राद्वारे ऊर्ध्व दिशेतून अधर दिशेपर्यंत मोठ्या प्रमाणावर तमोगुणाचे प्रक्षेपण केले जाते.

३. चौकोनी आकाराचा कंदिल

या कंदिलातून सतत वलयांकित स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित होतात. या प्रकारच्या आकाशकंदिलातून तमोगुणी शक्ती तमोगुणाचे प्रक्षेपण चौकोनी स्वरूपाचे कोष्टक स्वरूपाचे यंत्र बसवतात आणि त्या माध्यमातून वास्तूच्या चारही बाजू दूषित करतात.

४. लंबगोल आकाराचा कंदिल

या प्रकारच्या आकाशकंदिलात आकारत्व विहिनता प्राप्त झालेली असल्यामुळे तमोगुणी शक्तींना या प्रकारच्या कंदिलातून तमोगुणाचे प्रक्षेपण करता येत नाही. या कंदिलातून सात्त्विकतेचे प्रक्षेपण होते.’

– श्री. निषाद देशमुख (१५.१०.२००६)