संतांना अपेक्षित असते, ती आत्मज्योत प्रज्वलित करणारी दीपावली !

दिवाळी आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. तो आत्मिक आनंद म्हणजेच त्यांच्या दृष्टीने दिवाळी आहे !

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी ! – संत नामदेव

साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा ! – संत तुकाराम

आजी दिवाळी दसरा । आलो विठ्ठलाच्या द्वारा ।। – संत एकनाथ