शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते ‘धर्मवीर संभाजी महाराज मार्ग’ या फलकाचे अनावरण !

‘धर्मवीर संभाजी महाराज मार्ग’ या फलकाचे अनावरण करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि अन्य धारकरी

सांगली, २३ जून (वार्ता.) – महापालिकेच्या समोरील वासुदेव बळवंत फडके चौकामध्ये १६ मे १९९६ या दिवशी ठराव क्रमांक १०० अन्वये या मार्गाचे ‘धर्मवीर संभाजी महाराज मार्ग’, असे नामकरण करण्यात आले होते. काळाच्या ओघात ते विस्मरणात गेले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, सचिन पवार, अंकुश जाधव, राजू पुजारी, अविनाश सावंत, हरिदास कालिदास, अमित करमुसे, नितीन काळे, चंद्रशेखर जगताप, प्रसाद रिसवडे, राजेंद्र शहापुरे, अनिल तानवडे, मिलिंद तानवडे, शेलार, अविनाश जोशी, गजानन माने, केदार सूर्यवंशी यांसह अन्य उपस्थित होते.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा १६ मे १९९६ या दिवशी झालेला हा ठराव मिळवण्यासाठी सामाजिक कायकर्ते श्री. शरद फडके यांनी विशेष प्रयत्न केला.