राज्यातील गुंडांना ६ मासांत तडीपार करू ! – मुख्यमंत्री

मडगाव – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शासन पुढील ६ मासांत राज्यातील गुंडांना तडीपार करेल, असे म्हटले आहे. कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर १६ फेब्रुवारीला गुंडांच्या अन्य एका टोळीने आक्रमण केल्यानंतरचे त्यांचे हे वक्तव्य आहे.