‘कोविड-१९’च्या औषध निर्मितीसाठी सरकारने ‘गंगाजल’ वापरून अधिक संशोधन करावे ! – वरिष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘कोविड-१९ वर गंगाजल रामबाण उपाय आहे का ?’ या विषयावर ऑनलाईन ‘सनातन संवाद !’

पुणे – परदेशांतून येणार्‍या ‘कोविड-१९’ वरील लसी संपूर्ण चिकित्सा करून आल्या असतील, ही शक्यता अतिशय नगण्य आहे. इतक्या तातडीने लसीचा मानवावर प्रयोग करण्यात आला आणि अनेकांवर त्याचा उलट प्रभाव पडला, हेसुद्धा जगजाहीर आहे. आम्ही ‘कोविडचा बिमोड करण्यासाठी गंगाजल वापरावे’, असे म्हणत आहोत. ते सर्वांच्या आरोग्याचे वर्धक आहे. आमचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन आहे की, गंगाजलाच्या उपयोगाने रुग्ण बरा होत असल्यास गरीब रुग्णालाही हे औषध परवडण्यासारखे आहे. यासाठीच गंगाजल वापरून कोविडच्या औषध निर्मितीसाठी अधिक संशोधन करावे. यातून राष्ट्रालाच लाभ होईल, असे प्रतिपादन अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘सनातन संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

भारत सरकारने भारतीय बनावटीच्या लसीला अनुमती देऊन त्याचे कौतुक केले आहे. अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली काशी हिंदू विश्‍वविद्यालयाच्या आधुनिक वैद्यांच्या गटाने गंगा नदीच्या संदर्भात संशोधन केले. कोविडपासून वाचण्यासाठी गंगाजलाचा उपयोग करून ‘नॅझल स्प्रे’ सिद्ध करण्यात आला. यासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी, तसेच गंगा नदीचे वैज्ञानिक अन् वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने असलेले महत्त्व जाणून घेण्यासाठी ‘कोविड-१९ वर गंगाजल रामबाण उपाय आहे का ?’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम यू ट्यूब आणि फेसबूक यांच्या माध्यमांतून ३४ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला.

वरिष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता

अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी गंगा नदीविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

ऋषिमुनींनी ‘सामूहिक पर्वस्नाना’ची  प्रथा आरंभ करण्यामागील कारण

पौराणिक ग्रंथांमध्ये गंगाजल पवित्र मानले गेले आहे. ऋषिमुनींनी गंगाजलाच्या गुणांना जाणले होते. त्यांनी नदीत स्नान करण्याचे महत्त्वही सांगितले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास जे लोक विशिष्ट वेळी गंगाजलामध्ये स्नान करतात, त्यांच्यात एक प्रकारची प्रतिकारक्षमता निर्माण होते. मकरसंक्रांतीनंतरच्या कुंभमेळ्यात १५ ते १६ कोटी लोक स्नान करतात, आचमन करून जेवतात आणि १० कि.मी. च्या परिघात एकत्र रहातात. त्यातील काही लोक रुग्ण असतात; मात्र स्नान केल्यानंतर रुग्णाईत असलेल्या व्यक्तीमधील जिवाणूंमुळे एका पद्धतीने लसीचे अंश अन्य व्यक्तीला मिळतात आणि त्यांच्या शरिरात ‘मेटाफायलॅक्टीक रिअ‍ॅक्शन’ (रोगावर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया) होते. यामुळे त्या विशिष्ट रोगापासून व्यक्तीचे संरक्षण होते. हेच ओळखून ऋषिमुनींनी ‘सामूहिक पर्वस्नाना’ची प्रथा आरंभली.

गंगा नदीमध्ये प्राणवायू खेचण्याची क्षमता अधिक असणे

गंगा नदीचा गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंतचा २.५ सहस्र किलोमीटरचा मार्ग आहे. गंगा नदी अतिशय उंचावरून वहाते. त्यामुळे तिच्यात गतीशील ऊर्जा अधिक असते. त्यामुळे तिच्यात पुष्कळ स्थिर ऊर्जा निर्माण होऊन त्यात प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता अधिक होते. तिचा प्रवाह नागमोडी आहे. शीतकपाट, तसेच वातानुकूलित यंत्रांतील असलेल्या ‘कॉईल’मध्ये जितके अधिक वेटोळे असतात, तितके अधिक त्याची थंड करण्याची क्षमता असते. त्यात प्राणवायू खेचण्याची क्षमता अधिक असते. हेच सूत्र गंगा नदीला सुद्धा लागू होते. म्हणूनच ऋषिमुनींनी या नदीला सर्वाधिक पवित्र म्हटले आहे. ‘गंगा नदीच्या केवळ दर्शनाने मुक्ती मिळते’, असे म्हटले जाते.

गंगाजलामध्ये ‘बॅक्टेरिओफाज’ मिळते, हे सप्रमाण सिद्ध !

कोविड संक्रमण चालू होण्याच्या कालावधीमध्ये काशी हिंदू विश्‍वविद्यालयाने सिद्ध केलेले संशोधनपत्र वाचनात आले. गंगाजलामध्ये ‘बॅक्टेरिओफाज’ आहे की, जे गंगा नदीच्या पाण्याला प्रदूषित होण्यापासून वाचवते. त्यामुळे गंगा नदीचे पाणी कधीही खराब होत नाही. यावरून कोविड-१९ च्या संक्रमणाविरोधात आपण गंगाजल वापरू शकतो, असा विचार आला. हॅकिन्स नावाच्या ब्रिटन शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, गंगा नदीत ‘बॅक्टेरिओफाज’ मिळते. त्यांनी हे सप्रमाण सांगितले की, गंगा नदीच्या काठावर एकीकडे कपडे धुतले जात असतांना तिथेच स्नान करणारे लोक मात्र तेच पाणी पिऊनही आजारी पडत नाहीत.

गंगा नदीत अनेक किरणोत्सर्गी घटक असणे

गंगा नदीत अनेक किरणोत्सर्गी घटक आहेत, जे आपल्या शरिरातील प्रतिकारक्षमता वाढवू शकतात, याचाही अभ्यास करण्यात आला. त्यासहित रौप्य, तांबे, जस्त अगदी संतुलित प्रमाणात आढळले. कोविड-१९ हा प्रतिकारक्षमता अधिक असलेल्यांना संक्रमित होत नाही, असे अभ्यासातून लक्षात आले होते.

आय.सी.एम्.आर्. ने  ‘कोणतीही चिकित्सकीय माहिती नाही’, असे सांगत संशोधन करण्यास नाकारणे

कोविड-१९ विषाणूच्या केंद्रात ‘रिबोन्यूक्लिक अ‍ॅसिड’ असते आणि ‘स्टॅनफोर्ड’ विद्यापिठाच्या अहवालात असे नमूद करण्यात आले होते की, ‘बॅक्टेरिओफाज’ हा श्‍वासातील विषाणूंच्या केंद्रांना तोडून टाकतो आणि विषाणू निकामी होऊन जातो. या सर्व अभ्यासानंतर एक संशोधनपत्र सिद्ध करण्यात आले. ते पत्र राष्ट्रपतींना देण्यात आले. त्यानंतर एक समूह सिद्ध करण्यात आला. त्यांच्याकडून जलशक्ती मंत्रालय, नेरी, आय.सी.एम्.आर्. या संस्थांना पत्र देण्यात आले. आय.सी.एम्.आर्.्ने एका बैठकीचे आयोजन करून याची माहिती जाणून घेतली आणि ‘कोणतीही चिकित्सकीय माहिती नाही’, असे सांगत हे पत्र रहित केले. याची सूचना आम्हाला थेट मिळाली नाही. आम्ही त्यांना संशोधनाची विनंती केली असता त्यांनी मात्र याकडे कोणतेही लक्ष दिले नाही. त्यानंतर काशी हिंदू विश्‍वविद्यापिठाच्या डॉक्टरांनी चिकित्सा करून त्या पत्रात अधिक माहिती घातली आणि ते पत्र आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पाठवण्यात आले. याच पत्राचा विश्‍वातील अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि त्या पत्राला स्वीकारण्यात आले. गंगा नदीच्या वैशिष्ट्यांना वैश्‍विक विज्ञान जगात आणणारे हे पहिले आंतरराष्ट्रीय पत्र होते.

काशी हिंदू विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी गंगाजलापासून ‘नॅझल स्प्रे’ सिद्ध करणे

कोविड संक्रमण काळात आणखी अभ्यास केल्यानंतर गंगा नदीजवळील शहरातील कोविडच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक होते, हे शासकीय आकडेवारीतून सिद्ध झाले. त्यानंतर काशी हिंदू विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी गंगा नदीच्या जलापासून ‘नॅझल स्प्रे’ सिद्ध केला.

एकीकडे ४-५ सहस्र रुपयांची लस होती, तर दुसरीकडे ‘बॅक्टेरिओफाज’ असलेला ‘नॅझल स्प्रे’ केवळ ३०-३५ रुपयांमध्ये उपलब्ध केला गेला. तो विषाणूंना मारण्याची क्षमता असलेला होता.

गंगाजलाच्या ‘नॅझल स्प्रे’ला करण्यात आलेला विरोध

औषध आस्थापनांना प्राधान्य देण्यासाठी स्प्रेच्या निर्मितीला आडकाठी करण्याचा प्रकारही अनुभवण्यास आला. आम्ही अनधिकृतरित्या या स्प्रेचा प्रयोग १०० हून अधिक कोविड रुग्णांवर दिला. ते रुग्ण ७ दिवसांमध्ये बरे झाले. हे संशोधन सादर करण्यात आले असता आम्हाला उलट प्रश्‍न करून ‘हे संशोधनाचा प्रयोग थेट मानवावर करणे योग्य नाही, तसेच हा प्रयोग प्राण्यांवर आधी करण्यात यावा’, असे एथिकल कमिटीकडून सांगण्यात आले.

गंगा नदीजवळ होत असलेले बांधकाम घातक ठरण्याची शक्यता

उत्तरांचलमध्ये एका खासगी आस्थापनाने ३ मोठे बांध बांधण्याचे कार्य हाती घेतले होते. त्याविरोधात आवेदन केल्यानंतर तत्कालीन राष्ट्रप्रती प्रणव मुखर्जी यांनी या प्रकल्पाला रोखले. त्यानंतरही २६४ हून अधिक बांध बांधण्यात येणार होते. ते रोखण्यात आले. अशाच प्रकारे काही स्थानिक लोक आणि तत्कालीन सरकार मिळून नदीजवळच्या पूरक्षेत्रातील जमिनी बांधकामासाठी वापरत होते. लखनौमध्ये अशाच प्रकारे झालेल्या बांधकामामुळे एक वेळ अशी येईल की, लखनौमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. कोणत्याही नदीची पवित्रता आणि शुद्धता यांना हानी पोचवल्यास आपल्याला त्याचे मूल्य चुकवावेच लागेल.

गंगा नदीचे आश्‍चर्यकारक वैशिष्ट्य

गंगा नदीमध्ये जवळपास ३०० हून अधिक नद्यांचा संगम आहे. गंगेचे पाणी पांढरे आणि यमुनेचे हिरवे असते. गंगेची वाळू मळकट रंगाची, तर यमुनेची वाळू लाल रंगाची असते. दोघांचीही पीएच् क्षमता वेगळी आहे. गंगेचे पाणी गतीने वहाते, तर यमुनेचे पाणी स्थिर असते. तरीही यमुनेचे जल प्रयागपासून संपते आणि हिरवे जल गंगेत मिळाल्यावर पांढरे होते. यमुना नदी संपल्यावर त्यातील प्राणीजगत हे गंगेच्या पात्रात निदर्शनास येतात. हे निसर्गाचे आश्‍चर्यकारक वैशिष्ट्य आहे.

गंगा नदीला वाचवून तिचे पूजन करणे आवश्यक !

आध्यात्मिक भाषेत सांगायला गेलो, तर जग स्वीकारत नाही; परंतु वैज्ञानिक भाषेत सांगितल्यास संपूर्ण जग स्वीकारते. गंगा नदीने कधीही भेदभाव केला नाही. माझे संपूर्ण भारतियांना आवाहन आहे की, गंगा नदीला सर्वांनी वाचवायला हवे, गंगा नदीची पूजा करायला हवी. गंगा नदीला प्रतिष्ठित करायला हवे, तरच त्याचे औषधी गुण आणखी फलद्रूप होतील. गंगा नदी म्हणजे भारतियांचा सांस्कृतिक वारसा आहे. त्यासाठी प्रत्येकाने लढायला हवे.

मला गंगा नदीसाठी कार्य करायला मिळाले, हे दैवी नियोजनच आहे ! – अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता

मी अतिशय भाग्यवान आहे की, मी गंगा नदीसाठी कार्य करत आहे. हे सर्व दैवी नियोजन आहे. एकदा माझ्याकडे एक याचिका आली होती. त्यामध्ये गंगा नदीसंदर्भात अभ्यास केल्यानंतर एका आस्थापनाकडून होणार्‍या नदी प्रदूषणावर तोडगा काढला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालापर्यंत हे प्रकरण गेले. त्या वेळी गंगा नदी संदर्भात अधिक वाचनात आल्याने साक्षात् शंकराचार्यांनी मला याचिकेसंदर्भात बोलवले. त्यांनी मला त्यांची याचिका लढण्यास सांगितली. त्या वेळी मी शंकराचार्य यांना माझ्या कार्यालयात बोलावून स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यांनी ते स्विकारले आणि माझ्या कार्यालयात येऊन त्यांनी स्वाक्षरी केली, तसेच त्यांनी ‘गंगा नदीसाठी तुम्ही कार्य कराल’, असा आशीर्वादही दिला. या कार्याचे मी एकही पैसे घेतले नाहीत आणि सेवा म्हणून हे कार्य करत राहिलो.