श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

श्रीनगर – येथील एच्.एम्.टी. भागात ३ आतंकवाद्यांनी अचानक केलेल्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा झाले, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलीस महानिरिक्षकांनी दिली. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा या आक्रमणामागे हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आक्रमणानंतर आतंकवादी एका चारचाकी वाहनातून पसार झाले. यांपैकी दोघे जण पाकिस्तानी, तर एक जण स्थानिक आतंकवादी असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.