कोरगाव, पेडणे येथून २० लाखांचे अमली पदार्थ कह्यात

पणजी – कोरगाव, पेडणे येथे पेडणे पोलिसांनी घातलेल्या धाडीत २० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. बांद्रा, मुंबई येथील लार्सन रिचर्ड, कोरगाव येथील रेने सांतान डिसोझा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ८ सहस्र ६०० रुपयांचा गांजा, ५ लाख ६० सहस्र रुपयांचा चरस आणि १४ लाख रुपये किमतीची कॅनाबिस लागवड कह्यात घेण्यात आली. कॅनाबिस लागवड घरात करण्यात आली होती. गेल्या २ मासांत कॅनाबिस लागवड केल्याप्रकरणी धाड घालण्यात आलेली ही सहावी घटना होती.