पुण्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग करून आत्महत्येचा प्रयत्न करणारा शिपाई बडतर्फ

असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

पुणे – शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात २० ऑक्टोबरला रात्रपाळीवर असणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या मयूर सस्ते नावाच्या पोलीस शिपायाला अपर पोलीस आयुक्त डॉ. सुपेकर यांनी बडतर्फ करण्याचा आदेश दिला आहे. मध्यरात्री सदर महिला कर्मचार्‍याचा डोळा लागल्याची संधी साधून त्याने विनयभंग केला. सदर महिला तक्रार करेल या भीतीने त्याने स्वतःवर बंदुकीची गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कामावरील ‘गार्ड’ घायाळ झाला होता. त्यानंतर सस्ते याला अटक करण्यात आली होती. (कायद्याचे रक्षण करणारेच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेची काय स्थिती असेल याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)