बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू शाकिब अल् हसन यांची क्षमायाचना

श्री महाकाली देवीची पूजा केल्यामुळे धर्मांधांची धमकी

हिंदूंच्या देवतेची पूजा केल्यावर धर्मांधांना त्याचा राग का येतो ?, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी हिंदूंना सांगतील का ? हिंदूंना सर्वधर्मसमभाव शिकवणारे, गांधीगिरी करण्यास सांगणारे धर्मांधांना या गोष्टी का शिकवत नाहीत ? कथित ‘गंगा जमूनी तहजीब’चे पालन करण्याचा दबाव केवळ हिंदूंवरच का आणला जातो ? असा एकतर्फी सर्वधर्मसमभाव हिंदू कधी सोडणार ?

नवी देहली – बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू शाकिब अल् हसन यांनी कोलकाता येथे श्री महाकाली मातेची पूजा केल्यानंतर त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळू लागल्या. यावर त्यांनी क्षमा मागितली आहे. ‘मी तेथे कार्यक्रमाला गेलो होतो; मात्र मी पूजा केली नाही. जर कुणाला तसे वाटत असेल, तर मी पुन्हा तेथे जाणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात त्यांनी पूजा केली होती. यावरून फेसबूकद्वारे त्यांना एका व्यक्तीने ठार मारण्याची धमकीही दिली. सामाजिक माध्यमांतून विरोध केला जात असल्याने शाकिब यांनी अखेर क्षमा मागितली.