उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अद्वैत पोत्रेकर हा एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
(‘वर्ष २०१६ मध्ये चि. अद्वैत पोत्रेकर याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)
१. भावाविषयी प्रेमभाव
‘एकदा खेळतांना अद्वैत आणि सोहम् (अद्वैतचा मोठा भाऊ) दोघेही पडले. तेव्हा ‘स्वतःला काय लागले ?’, हे न पहाता अद्वैत स्वतःहून लगेच बर्फ घेऊन आला आणि ‘सोहम्’ला लावा’, असे वडिलांना म्हणाला. त्याला ‘सोहम्’दादाला रागावू नये’, असे वाटते. जेव्हा मी (सौ. सोनाली पोत्रेकर) सोहम्’ला रागावत असते, तेव्हा तो त्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो.
२. उत्तम स्मरणशक्ती
अद्वैत बाहेर गेल्यावर कधीच कुठलीच वस्तू विसरत नाही. तो स्वतःची वस्तू आठवणीने आणतो, तसेच सोहम्’च्या वस्तूही आणतो.
३. निरीक्षणक्षमता
अद्वैत खेळत असतांना ‘सभोवती काय चालले आहे ?’, याकडे त्याचे लक्ष असते. तो सहजतेने सगळे निरीक्षण करत असतो. ‘त्याचे निरीक्षण चालू आहे’, हे कुणाला कळतही नाही. तो बोलतांना कधीतरी त्याचे निरीक्षण सांगतो. तेव्हा कळते.
४. इतरांना साहाय्य करणे
अद्वैतला घरकामांत साहाय्य करायला आवडते.
५. स्वीकारण्याची वृत्ती
सोहम् प्रतिदिन अग्निहोत्र करतो. तेव्हा अद्वैतलाही ‘ते करावे’, असे पुष्कळ वेळा वाटते. ‘आज तू करू नको ’, असे सांगितले, तर तो लगेच स्वीकारतो आणि ‘अग्निहोत्राचे चैतन्य आणि संरक्षककवच मिळू दे’, अशी प्रार्थना करतो. सोहम्’ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो श्रद्धेने करतो.
६. समाधानी वृत्ती
कधी दुकानात गेल्यावर अद्वैत काहीही मागत नाही. एकदा ‘मॉल’मध्ये पुष्कळ सुंदर आणि आकर्षक टॉवेल होते; म्हणून मी त्याला विचारले, ‘‘तुला कुठला टॉवेल घेऊ ?’’ तो म्हणाला, ‘‘माझा टॉवेल चांगला आहे, मग उगीच कशाला नवीन घ्यायचा ?’’
७. आमच्या घरी प्रणव मणेरीकर हे साधक यायचे. ते म्हणायचे, ‘‘काहीही झाले, तरी अद्वैत चिडत नाही.’’
८. साधनेचे गांभीर्य
८ अ. आईच्या सेवेचे महत्त्व ओळखणे : अद्वैत मला म्हणतो, ‘‘आई, तू पुष्कळ सेवा कर. तू सेवा केलीस, तर आम्ही आजारी पडत नाही.’’
८ आ. अनुसंधानात रहाणे : एकदा आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. तेथे सर्व मुले मोठ्या आवाजात गाणी लावून नाचत होती. त्या वेळी अद्वैतचे रामरक्षास्तोत्र म्हणणे चालू होते. यावरून ‘तो तशा परिस्थितीतही अनुसंधानात होता’, हे लक्षात आले.
८ इ. चुकांविषयी सतर्कता : बालसंस्कारवर्गात जे सांगतात, त्याचे अद्वैत पालन करतो. त्याला लिहिता येत नसल्यामुळे तो ‘‘आई, ही चूक लिहून दे’’, असे माझ्या मागे लागतो आणि ‘प्रत्येक चुकीवर कशी स्वयंसूचना असली पाहिजे ?’, ते सांगतो. त्याला चूक सांगितल्यावर तो ती आनंदाने स्वीकारतो. परत तीच चूक झाली, तर त्याला वाईट वाटते. त्याला दुसर्यांच्याही चुका चांगल्या प्रकारे लक्षात येतात. तो त्या चुका नम्रपणे आणि स्पष्टपणे सांगतो.
९. आश्रमाप्रती भाव
त्याला जेव्हा ‘तू एवढा गोड का आहेस ?’, असे मी (बाबा) विचारतो. तेव्हा ‘मी आईच्या पोटात असतांना रामनाथी आश्रमात गेलो होतो; म्हणून गोड आहे’, असे तो सांगतो.
१०. स्वभावदोष
हळूहळू कृती करणे’
– सौ. सोनाली पोत्रेकर आणि श्री. रवींद्र पोत्रेकर (अद्वैतचे आई-वडील), वडोदरा, गुजरात. (१०.६.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |