हिंदूंनो, धर्माचरणासाठी हे कराच !

‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ  धर्माचरणात आहे. दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजा-अर्चा,  सण आणि उत्सव हे शास्त्र समजून घेऊन करणे, तसेच कुलाचार अन् कुलपरंपरा सांभाळणे, यालाच  ‘धर्माचरण’ असे म्हणतात. हिंदु संस्कृतीतील उपासनामार्ग, सण-उत्सव, आचारविचार, आहारविहाराच्या पद्धती यांतूनच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीतून सत्त्वगुण वाढेल, म्हणजे साधना होईल, अशी योजना हिंदु धर्मात आहे. धर्माचरणासाठी आपण काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

१. गोल टोप्या घालून फिरणारे लाज बाळगत नाहीत; मात्र कपाळावर टिळा लावण्यास हिंदूंना लाज वाटते. विवाहित स्त्रियाही कुंकू लावत नाहीत. धर्माचरण म्हणून महिलांनी कुंकू आणि पुरुषांनी टिळा लावावा.

२. दिवसातून ५ वेळा भूमीवर डोके ठेवून नमाज पढणार्‍या मुसलमानांकडून आपण धर्मप्रेम शिकले पाहिजे. हिंदूंनो, दिवसातून किमान ५ वेळा तरी ‘हे श्रीकृष्णा, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण कर !’, ही प्रार्थना करूया.

३. भावी पिढीचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवू नका !

४. एकमेकांना भेटल्यावर आणि भ्रमणभाषवर बोलतांना एकमेकांना ‘हॅलो’ नव्हे, तर ‘नमस्कार’ म्हणा !