जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी
देवाचा वास ।
हे सुवचन ठाऊक आहे
बहुतेक सर्वांस ॥
परंतु कलियुगीची सांप्रतस्थिती
आहे वेगळी ।
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी
दिसतात ‘कोरोना’चे बळी ॥ १ ॥
कृपया अंतर्मुख होऊन विचार करा ।
आणि कटू सत्य हे सुविनये स्वीकारा ॥
पृथ्वीवरील देवदेवतांसह धर्मस्थळांंची केली विटंबना ।
तेथील प्रवेशाचे नियमही
पाळण्याची लाज वाटते धर्मद्रोह्यांना ॥ २ ॥
म्हणून आता मान खाली घालून
नियम पाळण्यास लावतो आहे ‘कोरोना’ ।
ही चपराक आहे निर्लज्ज आणि उन्मत्त या धर्मद्रोह्यांना ॥
नियम सारे पायदळी तुडवून यांना देवाला भेटण्याची घाई ।
‘कोरोना’ राक्षसाच्या भीतीने
नियम पाळण्याविना आता पर्याय नाही ॥ ३ ॥
दुचाकी-चारचाकी चालवणारा ज्या अर्थी कुणी आहे ।
त्या अर्थी या प्रचंड विश्वाचा चालक निश्चितच कुणीतरी आहे ॥
एवढे न्यूनतम भान ठेवा अन् शरण जा त्या विश्वचालकाला ।
अन् वाढवा ईशभक्तीची शक्ती,
जी नष्ट करील ‘कोरोना’ला ॥ ४ ॥
‘कोरोना’ महासंकट ठरो राष्ट्रीय इष्टापत्ती ।
हीच करतो सर्वांसाठी ईशचरणी नम्र विनंती ॥ ५ ॥
– आपला नम्र,
श्री. द.र. पटवर्धन, कोलगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (३०.३.२०२०)