वारकरी संप्रदायाचा महामंत्र अन् त्याचा अर्थ

‘रामकृष्ण हरि ।’ याचा अर्थ ‘रामासारखे आचरण ठेवले, तरच आज ना उद्या मनाने कृष्ण होता येते आणि मनाने कृष्ण झाल्याविना जगत् हरिरूप भासत नाही.’ यालाच ‘जीवन्मुक्ती’ असे म्हणतात. ही जीवनाची इतिश्री होय.’

विठ्ठलाच्या नामजपामुळे व्याधींपासून मुक्तता मिळत असल्याचे आधुनिक वैद्यांनी सिद्ध करणे !

‘पंढरपूरची वारी ही अतिशय विस्मयकारक आणि सर्वसामान्य मानवजातीला वरदानच ठरलेली आहे. सर्व वारकर्‍यांना काही ना काहीतरी व्याधी असते. असे असूनही ‘ते अडीचशे मैल अनवाणी प्रवास करून त्यांची प्रकृती उत्तम कशी रहाते ?’, याचे उत्तर आधुनिक वैद्यांनी प्रयोगाअंती शोधून काढले…

वारकर्‍यांचा भाव !

‘पालखी प्रस्थानापासून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत ‘माऊली’ कशी काळजी घेतात’, असाच भाव वारकर्‍यांच्या बोलण्यातून जाणवतो.

वारकर्‍यांची अनुपम विठ्ठलभक्ती !

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाच्या माध्यमातून आलेल्या अकल्पित दैवी अनुभूतीतून अनुभवलेली ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्यमय प्रीती !

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी ३० जूनला पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अधिवेशन परमपूज्य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

५०० गाड्यांचे शक्‍तीप्रदर्शन करत तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापुरात आगमन !

देवाला भक्‍तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्‍यंत लीन असतो. त्‍यामुळे पंढरपूरच्‍या विठ्ठलाच्‍या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्‍तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्‍न सामान्‍य नागरिकांच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !

मानाच्‍या संत मुक्‍ताबाई पालखीचे पंढरपुरात आगमन !

मानाच्‍या सात पालख्‍यांपैकी एक असलेल्‍या संत मुक्‍ताबाई यांची पालखी आज पंढरपुरात पोचली आहे. दुपारी ३ वाजण्‍याच्‍या सुमारास ही पालखी पंढरपुरात पोचताच वरुणराजाने पर्जन्‍यवृष्‍टीने तिचे स्‍वागत केले.

दिंड्यांसाठी ६५ एकरमधील प्‍लॉटची जागा निश्‍चित करण्‍यासाठी भाविकांचे निवेदन !

दिंड्यांसाठी येथील ६५ एकर मधील प्‍लॉट कायमस्‍वरूपी निश्‍चित करण्‍यात यावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांना दिले.

इंदापूर (पुणे) येथे संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा रंगला !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यातील दुसरे रिंगण इंदापूरमधील कस्‍तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्‍या प्रांगणामध्‍ये पार पडले. नगारखान्या पाठोपाठ २७ दिंड्या, संत तुकाराम महाजांची पालखी, ५० हून अधिक दिंड्या रिंगण प्रांगणामध्‍ये पोचल्‍या.