सोलापूर – पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो वारकरी येतात. या वारकर्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने सोलापूर, नागपूर, भुसावळ विभागांतून १३५ अधिकच्या रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी मध्य रेल्वेने १०० रेल्वेगाड्या सोडल्या होत्या. यंदा त्यात ३५ गाड्यांची वाढ केली आहे. पंढरपूर येथे रेल्वेस्थानकावर १२ तिकीट घर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या संख्येने जरी वारकरी आले, तरी अधिक काळ रांगेत उभे न रहाता त्यांना तिकीट मिळण्यास साहाय्य होणार आहे. वारकर्यांसाठी पंढरपूर रेल्वेस्थानकावर नवीन सुलभ शौचालयही बांधण्यात आले आहे.