इंदापूर (पुणे) येथे संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा रंगला !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍यातील दुसरे रिंगण इंदापूरमधील कस्‍तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्‍या प्रांगणामध्‍ये पार पडले. नगारखान्या पाठोपाठ २७ दिंड्या, संत तुकाराम महाजांची पालखी, ५० हून अधिक दिंड्या रिंगण प्रांगणामध्‍ये पोचल्‍या.

वारकर्‍यांसाठी महाराष्‍ट्र शासनाची विमा संरक्षण योजना !

या योजनेंतर्गत या कालावधीत एखाद्या वारकर्‍याचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍यास कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्‍यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्‍व आल्‍यास १ लाख आणि अंशत: अपंगत्‍व आल्‍यास ५० सहस्र रुपये, तसेच वारीच्‍या कालावधीत आजारी पडल्‍यास औषधोपचारासाठी ३५ सहस्र रुपयांपर्यंत खर्च मिळेल

७ जुलैपर्यंत दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिर २४ घंटे खुले रहाणार !

आषाढी यात्रेसाठी येणार्‍या अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे पदस्‍पर्श दर्शन आणि मुख दर्शन घेता यावे यासाठी २० जूनपासून २४ घंटे दर्शन व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

आषाढी वारी मार्गावरील खासगी रुग्‍णालये चालू ठेवण्‍याच्‍या आरोग्‍यमंत्र्यांच्‍या सूचना !

वारकर्‍यांना तात्‍काळ आरोग्‍यविषयक सुविधा उपलब्‍ध होण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागाने ‘आरोग्‍याची वारी, पंढरीच्‍या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्‍यक त्‍या आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.

वारकर्‍यांनी पाणी वापरासाठी कालव्‍याच्‍या घाटांचा उपयोग करावा ! – जलसंपदा विभागाचे आवाहन

जलसंपदा विभागाने आवश्‍यक ती काळजी घेतली आहे; पण वारकर्‍यांनी आंघोळ किंवा कपडे धुण्‍यासाठी कालव्‍यात न उतरता आवश्‍यकता वाटल्‍यास घाटांचा उपयोग करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

टाळा-मृदंगाच्या गजरात भोळ्याभाबड्या वारकर्‍यांच्या तोंडून वदवून घेतले अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’ असे वाक्य !

पंढरीच्या वारीत वृद्ध मुसलमानाकडून वारकर्‍यांच्या धर्मांतराचा प्रयत्न ! पुणे – चालू असलेल्या आषाढी वारीत एके ठिकाणी एक मुसलमान वृद्ध व्यक्ती वारकर्‍यांमध्ये येते आणि त्यांचा विठ्ठलनामाचा गजर करण्याऐवजी अल्लाचा गजर करण्याविषयी बुद्धीभेद करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यासाठी मुसलमान व्यक्ती ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’ या वाक्याला अभंगाप्रमाणे चाल लावते आणि भोळ्याभाबड्या … Read more

वारी : अध्‍यात्‍माचा प्रवास !

वारी वर्षातून एकदाच असते. त्‍यामुळे सततच ही आध्‍यात्मिक ऊर्जा मिळण्‍यासाठी, म्‍हणजे अध्‍यात्‍माचा हा प्रवास अखंड चालू ठेवण्‍यासाठी आणि आनंदी जीवन जगण्‍यासाठी तरुणांनी प्रतिदिन योग्‍य साधना करणे आवश्‍यक आहे.

विदेशी पाहुण्‍यांनी घेतला वारीचा आनंद !

जी-२० ‘डिजिटल अर्थव्‍यवस्‍था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्‍यात दाखल झालेला आहे. या कार्यगटातील विदेशी पाहुणे पालखी सोहळ्‍याचा आनंद घेण्‍यासाठी सहभागी झाले होते.

आषाढी यात्रेसाठी २१ जूनपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्‍यात येणार !

आषाढी एकादशीचा सोहळा २९ जून या दिवशी होणार आहे. त्‍यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्‍ये २१ जूनपासून पाणी सोडण्‍यात येणार आहे, तर २९ जून या दिवशी बंद करण्‍यात येणार आहे

आषाढी यात्रेच्‍या निमित्ताने दर्शन रांगेत यंदा १२ छतांची उभारणी !

यंदाच्‍या वर्षी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून दर्शनरांगेत एकूण १२ छते उभारण्‍यात येणार आहेत. या छतांमुळे एकाच वेळी अनुमाने १२ सहस्र भाविकांचे ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होईल.