कुणी मुसलमान गरब्याच्या कार्यक्रमस्थळी घुसता कामा नये ! – विहिंप आणि बजरंग दल

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या उत्सवांवर असलेल्या जिहादी सावटापासून वाचण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या क्लृप्त्या योजाव्या लागतात, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट होय !

सनातन धर्माला अपकीर्त करणार्‍यांचे कटकारस्‍थान हाणून पाडा ! – महंत राजनाथ योगी महाराज

आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्‍थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना वेळीच त्‍यांची जागा दाखवा, असे आवाहन महंत राजनाथ योगी महाराज यांनी केले.

‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रे’मध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हा ! – सकल हिंदु समाजाचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यासाठी विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित राष्‍ट्रव्‍यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्‍तीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्त्वाची आहे.

विहिंप-बजरंग दल यांच्‍या वतीने कोल्‍हापुरात ‘शौर्य जागरण यात्रा’ !

छत्रपती शिवरायांनी स्‍थापन केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍यास ३५० वर्षे होत आहेत. त्‍याचसमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याचे औचित्‍य साधून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल यांच्या शौर्य जागरण यात्रेला अनुमती

‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !

हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.

सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.