कुणी मुसलमान गरब्याच्या कार्यक्रमस्थळी घुसता कामा नये ! – विहिंप आणि बजरंग दल

  • विहिंप आणि बजरंग दल यांच्याकडून गुजरातमधील सर्व गरबा आयोजकांना सूचना !

  • गरब्यात सहभागी होणार्‍या युवकांना लावावा लागेल टिळा, तसेच करावा लागेल गोमूत्राचा अभिषेक, हातात बांधावा लागेल दोरा !

कर्णावती (गुजरात) – ‘गरब्या’च्या माध्यमातून देवीची पूजा करण्याची एक संधी असते. काही ‘जिहादी’ अशा प्रसंगांचा दुरुपयोग करतात. मी गरब्याच्या सर्व आयोजकांना आवाहन करतो की, पंडालवाले, खाद्यपदार्थांची व्यवस्था करणारे, तसेच संरक्षणव्यवस्था करणारे, असे कोणतेच सदस्य मुसलमान असता कामा नये. तसेच ‘गरब्याच्या कार्यक्रमस्थळी आत जाणार्‍यांचे ओळखपत्र आणि आधारकार्ड यांची माहिती घेऊनच त्या व्यक्तींना अनुमती दिली जावी’, अशी सूचना विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी नवरात्राच्या निमित्ताने आयोजित गरबा खेळण्याच्या कार्यक्रमांमध्ये अनेक मुसलमान घुसतात आणि हिंदु युवती आणि महिला यांना ‘लव्ह जिहाद’ षड्यंत्रामध्ये फासण्याचा प्रयत्न करतात.

१. या वेळीही बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषदेचे हिंदुत्वनिष्ठ गरबा कार्यक्रमांच्या ठिकाणी उपस्थित राहून ‘मुसलमान युवक घुसता कामा नयेत’, या दृष्टीने लक्ष ठेवणार आहेत.

२. या जोडीलाच गरब्यात सहभागी होणार्‍या युवकांना टिळा लावण्यात येईल, त्यांच्यावर गोमूत्राचा अभिषेक करण्यात येईल, तसेच हातात लाल धागा बांधण्यात येईल. कुणी मद्यपान करून आले असेल, तर अशांनाही अनुमती नाकारण्यात येईल.

३. ‘चुकीच्या उद्देशांनी कार्यक्रमात घुसणार्‍यांना रोखण्यासाठी वर्ष २०१५ पासून अशा प्रकारचे उपाय योजले जातात’, असेही जैन या वेळी म्हणाले.

४. गेल्या काही कालावधीत विहिंप आणि बजरंग दल यांनी गुजरात राज्यात १६ जागरण यात्रा काढल्या, १ सहस्र १०० हून अधिक सभा घेतल्या, तसेच १८ सहस्रांहून अधिक कार्यकर्त्यांना ‘त्रिशूळ दीक्षा’ दिली. या माध्यमांतून हिंदु युवक आणि युवती यांच्यात जागरूकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ७ लाखांहून अधिक लोकांना या अभियानाच्या माध्यमातून जोडण्यात आले.

संपादकीय भूमिका 

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या उत्सवांवर असलेल्या जिहादी सावटापासून वाचण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या क्लृप्त्या योजाव्या लागतात, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट होय ! हिंदूंच्या कार्यक्रमांत कुणीच अन्य धर्मीय येण्याचे धाडसच करणार नाही, असे अभेद्य संघटन आणि दबदबा हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !