मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २ जुलै या दिवशी मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल या ५ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती संयंत्रांचे लोकार्पण केले. या वेळी सर्वजण एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईतील विविध आस्थापनांच्या ‘सी.एस्.आर्.’ फंडातून ही संयंत्रे उभारण्यात आली आहेत.
मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. pic.twitter.com/4Pl6BwzvYz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2021