राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करून भाजपकडून बंगालमधील हिंसाचाराचा निषेध !

बंगालमधील निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवून आणला. भाजपच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करून हिंसाचाराचा निषेध करण्यात आला.

संपूर्ण भारतीय जनता पक्ष बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या हिंसाचारात ज्या कार्यकर्त्यांची घरे लुटण्यात आली, व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या, अशा सर्वांना पुन्हा उभे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष निश्‍चितच करणार आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अशा गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

बंगालमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्या वाहनावर आक्रमण

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्यावर केजीटी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पंचखुडी येथे आक्रमण करण्यात आले. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

धगधगता बंगाल !

धगधगत्या बंगालची एकूण परिस्थिती पहाता नि भविष्यातील संभाव्य धोके यांकडे लक्ष ठेवून केंद्राने वेळेतच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे, हेच खरे !

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने निदर्शने

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू केला असून त्यात भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसेत ११ जण ठार !

पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

बंगालमध्ये हिंदूंसाठी काळरात्र !

भाजप घेत असलेल्या राष्ट्रहितैषी निर्णयांना जनतेचा पाठिंबा मिळतो आणि तो मतपेटीतही रूपांतरीत होतो, हे भाजपने लक्षात घेऊन असे निर्णय घेऊन त्याविषयी ठाम रहावे, हीच जनतेची अपेक्षा आहे. 

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर आक्रमणे करण्यात आली. एका ठिकाणच्या कार्यालयाला आगही लावण्यात आली, तर एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. भाजपने याविषयी कारवाईची मागणी केली आहे.