अपघातात मृत्यू झालेल्याचा भ्रमणभाष चोरून त्याचा वापर करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

अशा भुरट्या चोर्‍या करणार्‍या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

उमरगा (जिल्हा धाराशिव) येथील बिरुदेव मंदिरातील दोन दानपेट्यांतील रक्कम चोरट्यांनी पळवली !

शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बिरुदेव मंदिरातील २ दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यांतील ६० सहस्र रुपये पळवल्याची घटना ६ जानेवारीच्या पहाटे घडली.

काळ्या बाजारात विक्रीसाठी असलेले स्वस्त धान्याचे ८९० गोणी तांदूळ नागपूर पोलिसांकडून जप्त !

गोदामात एकूण ४४५ क्विंटल तांदूळ साठवून ठेवला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या ८ मासांपासून सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याची काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री चालू असल्याचे उघड झाले आहे.

सातारा जिल्ह्यात घरफोडींचे सत्र चालू !

दरोडेखोरांपासून पोलीस सामान्य जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, हे चिंताजनक आहे. काळाची आवश्यकता लक्षात घेऊन सामान्य जनतेने लकरात लवकर स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे.

वारजे माळवाडी (पुणे) येथील काळूबाई मंदिरात चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदूबहुल देशात हिंदूंच्या मंदिरांत चोर्‍या होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

जालंधर (पंजाब) येथील शिवमंदिरात चोरट्यांनी चांदी चोरण्यासाठी शिवलिंग फोडले !

पंजाबमध्ये काँग्रेसचे हिंदुद्वेषी सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच शिखांच्या गुरुद्वांवर अशा प्रकारचे आघात झाल्यास आश्‍चर्य ते काय ? अशा सरकारला जनतेने निवडणुकीत धडा शिकवणे आवश्यक !

ओरोस येथे पेट्रोलपंप लुटून पसार झालेल्या घाटकोपर (मुंबई) येथील ५ जणांना पकडण्यात पोलिसांना यश

सिद्धी पेट्रोलपंपावर चोरी करून पळणार्‍या ५ जणांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी कह्यात घेतले. त्यांच्याकडे ५७ सहस्र रुपये रोख रक्कम आणि ३० भ्रमणभाष संच पोलिसांना सापडले.

राजस्थानमधील रघुनाथ मंदिरातील देवतांच्या मूर्तींची चोरी

राजस्थानच्या बगडी गावामधील रघुनाथ मंदिरातील श्रीरघुनाथ आणि श्री गणेश यांच्या मूर्तींची, तसेच चांदीचे मुकुट अन् छत्र यांची चोरी करण्यात आली आहे.

शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावातील श्री रवळनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोराने फोडून त्याताल रोख रक्कम चोरली.

अररिया (बिहार) येथील गावामध्ये गोवंश चोरणार्‍यांपैकी एकाचा मारहाणीत मृत्यू

गोवंश चोरी करणार्‍यांकडे बंदुकीसारखी शस्त्रे असणे, यातूनच अशा गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात येते. अशा चोर्‍यांमागे गोहत्यार्‍यांची टोळी कार्यरत आहे का, हे पाहून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. मुळात राष्ट्रीय स्तरावर कठोर गोहत्या प्रतिबंधक कायदा व्हावा, असेच हिंदूंना वाटते !