सोलापूर – राज्यासह देशभरात श्री गणेशाचे आगमन जल्लोषात होत असतांना सोलापूर येथील प्रसिद्ध मश्रूम गणपति मंदिराचा सोन्याचा कळस पुन्हा एकदा मध्यरात्री चोरीला गेला. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. २५ किलो वजनाच्या पंचधातूच्या कळसावर २८ तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. या कळसाची अंदाजे किंमत १४ लाख रुपये आहे. मश्रूम गणेश मंदिराचे पुजारी श्री. संजय किसनराव पतंगे ३१ ऑगस्टच्या पहाटे मंदिरात गेल्यावर त्यांना कळस चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी याची माहिती पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंदवण्यात आला आहे.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तळेहिप्परगा गावात मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांनी मश्रूम गणपतीची स्थापना केली होती. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या योगदानातून बसवण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत, हे दर्शवणारी घटना ! श्री गणेशाचे आगमन होत असतांना गणपति मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला जाणे संतापजनक आहे. |