विरार येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

मुंबई – जालना जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर विरार येथील खानिवडे श्रीराम मंदिरात चोरट्यांनी २९ ऑगस्टला रात्री दानपेटी फोडून सर्व रक्कम चोरून नेली आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आहे. या संदर्भात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

मंदिरांत वारंवार होणार्‍या चोरीच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी आतातरी संघटित झाले पाहिजे !