आज रामपंचायतन मूर्ती चोरीच्या निषेधार्थ गावकरी अन्नत्याग करणार !

  • जांब समर्थ (जिल्हा जालना) येथील श्रीराम मंदिरात चोरी झाल्याचे प्रकरण

  • मूर्तींअभावी मंदिरात आरतीच झाली नाही !

जांब समर्थ येथील श्रीराम मंदिर

जांब समर्थ (जिल्हा जालना) – येथील श्रीराम मंदिरात २२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मूर्तीचोरीच्या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. मंदिरात प्रतिदिन सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजता आरती होते. समथ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या श्रीराम मंदिरातील श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, तसेच हनुमान यांच्या मूर्ती चोरीला गेल्याने २३ ऑगस्ट या दिवशी प्रथमच मंदिरात आरती झाली नाही. ‘मंदिरात देवच नसतील, तर कुणाची आरती करायची ?’, असा प्रश्न भाविक आणि ग्रामस्थ विचारत आहेत. मूर्ती चोरीचा निषेध म्हणून गावकरी २४ ऑगस्ट या दिवशी एक दिवस अन्नत्याग करणार आहेत. चोरांनी मंदिरातील एका खांबावर अडकवलेली चावी घेतली आणि कुलूप उघडून गाभार्‍यात प्रवेश केला. मूर्ती चोरून चावी पुन्हा त्याच जागेवर ठेवली.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांचा विचार करून आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, ही हिंदूंची अपेक्षा !