लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या ‘फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस’ने प्रवासासाठी अत्यंत धोकादायक देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तानचा समावेश केला आहे. या संस्थेने ब्रिटीश नागरिकांना एक संदेश प्रसारित केला आहे, ज्यात त्यांना वादळ, महामारी, उपासमार आणि युद्ध यांमुळे प्रभावित भागांत जाण्यास मनाई केली आहे. रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारूस आणि पॅलेस्टाईन या देशांत न जाण्यास सांगितले आहे. यासह ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अशा प्रकारची सूची प्रसारित केली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्राच्या अहवालानुसार वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणे आणि आतंकवादविरोधी कारवायांमध्ये १ सहस्र ५२४ लोक मरण पावले आणि १ सहस्र ४६३ जण घायाळ झाले.