तुलिंज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यातील हवालदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी शीख संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

गेल्या २२ दिवसांपासून चालू असलेल्या देहलीच्या सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या वेळी संत बाबा राम सिंह यांनी सिंघू सीमेवर १६ डिसेंबर या दिवशी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली.

डिंगणे येथील कोतवालाच्या आत्महत्येच्या प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

तालुक्यातील गावठणवाडी, डिंगणे येथील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी डिंगणे येथील नितीन श्रीधर सावंत आणि चंद्रकांत गणपत सावंत या दोघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.

ग्रामपंचायतीमधील पोलीस शिपायाने वारंवार त्रास दिल्यामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळेच शेवटी ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली. पोलिसांनी तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती, तर या महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त होण्याची वेळ आली नसती.

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांकडून आरोपपत्र प्रविष्ट

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात ४ डिसेंबर या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.

पुण्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग करून आत्महत्येचा प्रयत्न करणारा शिपाई बडतर्फ

असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

बारामती मधील व्यापार्‍याच्या आत्महत्येप्रकरणी विद्यमान नगरसेवकासह ९ जणांवर गुन्हा नोंद

गुन्हा नोंद असणार्‍या नगरसेवकांचा जनतेला आधार वाटेल का ? जनतेने कोणाला निवडून द्यायचे हे ठरवायला हवे.

‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘स्मार्टफोन’ न मिळाल्याने नैराश्यातून एकोशी (गोवा) येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवणे आवश्यक आहे. साधनेमुळे नैराश्यावर मात करता येत असल्याच्या अनेक अनुभूती साधक विद्यार्थ्यांना येत आहेत !

‘८ दिवसांत न्याय न दिल्यास आत्महत्या करीन !’ – निलंबित अन्न निरीक्षक राजीव कोरडे यांची शासनाला चेतावणी

अन्न आणि औषध प्रशासनाचे एक प्रामाणिक अधिकारी तथा निरीक्षक राजीव कोरडे यांना ४ मासांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. एका प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडल्याने त्यांचे निलंबन केल्याची चर्चा आहे.