सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये पत्रकारांचे मोठे योगदान ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील पत्रकार परिवर्तनाचे काम करत आहेत, तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे आयोजित पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलतांना केले.

इंग्लंड येथून परतलेल्या आणि ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात अहवालाच्या प्रतिक्षेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आंदोलनाचा पवित्रा

इंग्लंड येथून परतलेल्या आणि मडगाव येथील ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे रुग्ण नवीन कोरोना विषाणूसंबंधीच्या पुणे येथील प्रयोगशाळेच्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

तिनईघाट ते करंझोळ रेल्वेमार्गाच्या दुपरीकरणाला ‘वन्यजीव मंडळा’ची मान्यता ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री

दक्षिण-पश्‍चिम रेल्वेमार्गावरील तिनईघाट-केसलरॉक-करंझोळ या रेल्वेमार्गाच्या दुपरीकरणाला ‘वन्यजीव राष्ट्रीय मंडळा’ने मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ऊस उत्पादकांचे आंदोलन मागे

ऊस उत्पादकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी दिल्याने उस उत्पादकांनी त्यांचे चालू असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बर्ड फ्ल्यू’संबंधी सुरक्षिततेचे उपाय करण्याची चेतावणी

हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केरळ येथे मोठ्या प्रमाणात पशू मरत असल्याने केंद्राने गोव्यासह अनेक राज्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ पसरू नये यासाठी सुरक्षिततेचे उपाय करण्याची चेतावणी दिली आहे.

शिक्षिकेला अश्‍लील छायाचित्र पाठवणार्‍या धर्मांधाला सांगली येथून अटक

गोव्यातील एका शिक्षिकेला अश्‍लील ‘व्हिडिओकॉल’ करणारा आणि अश्‍लील छायाचित्र पाठवणारा मिरज, सांगली येथील इब्राहिम अहमद खाटीक याला गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने कह्यात घेतले आहे.

गोव्यात गांजाच्या लागवडीवर वर्ष २०२० मध्ये सर्वाधिक कारवाई

राज्यात अनधिकृतपणे करण्यात येत असलेल्या गांजाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोवा पोलिसांनी इतर वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अनधिकृत गांजा लागवडीवर केलेल्या कारवाईवरून ही गोष्ट उघड झाली आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेठ’ असे करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर संमत करावा ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे.

राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे आठ रुग्ण

राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध चालू आहे. लसीकरणासाठी सूची काढण्याचा आदेश जिल्ह्यांना दिला आहे.

पारपत्राचा कालावधी संपूनही ४ लाख २१ सहस्र २५५ विदेशींचा भारतात अवैधरित्या निवास, शोध घेण्यासाठी महाराष्ट्रात समितीची स्थापना

अधिकृत पारपत्राद्वारे देशात प्रवेश करून त्यानंतर अवैध वास्तव्य करणार्‍या विदेशींची इतकी संख्या असेल, तर भारतात घुसखोरी करणारे किती बांगलादेशी असतील !