पणजी, ६ जानेवारी (वार्ता.) – राज्यात अनधिकृतपणे करण्यात येत असलेल्या गांजाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोवा पोलिसांनी इतर वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अनधिकृत गांजा लागवडीवर केलेल्या कारवाईवरून ही गोष्ट उघड झाली आहे.
गोवा पोलिसांनी वर्ष २०२० मध्ये अनधिकृतपणे केल्या जाणार्या गांजा लागवडीवर कारवाई करून एकूण ४४ किलो गांजाची रोपे कह्यात घेतली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे पेडणे तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे वर्ष २०१९ आणि वर्ष २०१८ यांमध्ये अनधिकृतपणे केल्या गेलेल्या गांजाच्या लागवडीवर कारवाई करून यातून १ किलोपेक्षा अल्प गांजाची रोपेे कह्यात घेण्यात आली होती.