आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांकडून झालेल्या अक्षम्य चुकांमुळे परमवीर सिंह यांचे स्थानांतर ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबई पोलीस प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या सहकार्‍यांकडून अक्षम्य चुका झाल्या. त्या क्षमा करण्यासारख्या नाहीत. अन्वेषणात अडथळा येऊ नये, यासाठी परमवीर सिंह यांच्या स्थानांतराचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन !

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन झाले. देहली येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना १७ मार्च या दिवशी पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

जळगावच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील !

शिवसेनेने ही लढाई ४५ विरुद्ध ३० अशा फरकाने जिंकली. भाजपला अतिशय भक्कम बहुमत असतांनाही त्यांच्या हातून सत्ता गेली आहे.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात कोणीही दिशाभूल करू नये !- माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विरोधकांना सल्ला

१५ वर्षे मी पुणे-नाशिक सेमी ‘हायस्पीड’ रेल्वे प्रकल्प मंजूर होण्यासाठी अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. चाकण येथे शिवसेनेच्या वतीने विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.

पंढरपूर – मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिल या दिवशी मतदान, तर २ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे आयुक्त

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्यात जनता कर्फ्यू आणि दळणवळणबंदी लागू करण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी नाकारली

गोवा राज्यात आणि देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात जनता कर्फ्यू आणि दळणवळण बंदी लागू करण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाकारली आहे.

सिंधुदुर्गात शिमगोत्सवासाठी येणार्‍यांना कोरोनाविषयीची चाचणी करणे बंधनकारक

जिल्ह्याच्या बाहेरून येतांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे शक्य न झाल्यास नागरिकांनी जिल्ह्यात येताच त्याच दिवशी संबंधित गावातील जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे घशातील स्रावाची तपासणी (स्वॅब टेस्ट) करून घ्यावी.

थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ ! – उदयनराजे भोसले

थकबाकीमुळे वीजजोडणी तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अशा वेळी आम्ही ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभे राहू,असेही ते पुढे म्हणाले

सचिन वाझे यांना ‘ऑपरेट’ करणार्‍या सरकारमधील लोकांचा शोध घ्या ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

परमवीर सिंह यांना पदावरून हटवून हे प्रकरण संपणार नाही. सिंह आणि वाझे हे छोटे लोक आहेत. त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, याचा शोध घ्यायला हवा.