मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर वसुलीचे सखोल अन्वेषण करण्याचा उच्च न्यायालयाचा ‘कॅग’ला आदेश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाविषयी असा करार उपलब्ध नाही. टोलविषयी अधिसूचना घोषित करतांना प्रकल्पाचा व्ययही घोषित केलेला नाही, असे या याचिकेत म्हटले आहे.

वैद्यकीय कर्मचार्‍यांवरील आक्रमणाच्या विरोधातील कारवाईमधील त्रुटी शोधण्यासाठी शासन तज्ञांची समिती स्थापन करणार

उपचाराच्या वेळी रुग्णांच्या नातेवाइकांकडून भावनेच्या भरात अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा अप्रिय घटना घडल्यास रुग्णालयाची तोडफोड केली जाते. काहीवेळा उपस्थित आधुनिक वैद्य आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर आक्रमण केले जाते.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत दर्शनासाठी खुले रहाणार !

दर्शनास येतांना ‘मास्क’ घालणे बंधनकारक असून भाविकांनी सुरक्षित अंतर ठेवून रांगेतून दर्शन घ्यावे. भाविकांनी सायंकाळी ६ नंतर मंदिर आणि मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त येणार्‍या नागरिकांना आमदारांचे पत्र किंवा प्रशासकीय अधिकारी यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे.

केळघर (जिल्हा सातारा) येथे सीमा शुल्क विभागाची धाड

सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तावळी तालुक्यातील केळघर येथे एका ‘फार्म हाऊस’वर धाड टाकण्यात आली. तेथे २३ किलो ६३१ ग्रॅम इतका गांजा आढळून आला असून तो शासनाधीन करण्यात आला आहे.

मालवण येथील पारंपरिक मासेमारांचे साखळी उपोषण चालूच मासे खरेदी-विक्री बंद

सागरी पर्यटन व्यावसायिकांचा मालवणमध्ये कडकडीत बंद

कर्नाटकने पाणी वळवल्याने म्हादई नदीचे २० किलोमीटर अंतरापर्यंतचे पात्र कोरडे !  सुदिन ढवळीकर

म्हादई नदी आता आमच्या हातात राहिलेली नाही. या नदीचे पाणी कळसा भंडुरा प्रकल्पाद्वारे मलप्रभा नदीत वळवण्यात आले आहे.

अर्थसंकल्पाविषयीच्या आगामी विधानसभा अधिवेशनाची समयमर्यादा अल्प करावी ! – विरोधी पक्षांची मागणी

आचारसंहिता लागू असतांना शासनाने दीर्घ कालावधीचे विधानसभा अधिवेशन घेणे योग्य नाही.

१० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना मंडल अधिकारी जाळ्यात !

तळागाळातील भ्रष्टाचार संपण्यासाठी लाच घेणार्‍यांना त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

गतीरोधकातून विद्युत् निर्मिती करणार्‍या पुणे येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनास केंद्र सरकारचे ‘पेटंट’

येथील पॉलिटेक्निकच्या (एस्.व्ही.सी.पी.) प्राध्यापिका सौ. वेणूताई चव्हाण आणि विद्यार्थी यांनी मीनल मजगे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेचा वापर करून ‘पॉवर जनरेशन यूजिंग स्पीड ब्रेकर’ हा प्रकल्प विकसित केला आहे.