
नगर – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन झाले. देहली येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना १७ मार्च या दिवशी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दिलीप गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. वर्ष २००३ ते २००४ च्या काळात केंद्रातील भाजप सरकारमध्ये त्यांनी जहाज बांधणी राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला.
दिलीप गांधी यांचा नगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभाग होता. नगर येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी ते वेळोवेळी साहाय्य करत होते. तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी संसदेत आवाज उठवत होते.
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !