मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ती समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. येत्या काळात मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन.

बाळ बोठे यांची बडदास्त ठेवली जात आहे ! – रूणाल जरे यांचा आरोप

आरोपीला मदत करण्यापर्यंत पोलिसांची मजल कशी जाते ? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडल्यास नवल काय ? याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरत आहे, असेच सर्वसामान्यांना वाटेल !

मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून भाविकांसाठी कुंड खुले करा ! – सुनील घनवट, प्रवक्ते, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ होणे हा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्यातील एक विजय !

बारावी जीवशास्त्राच्या पुस्तकात व्याकरणाच्या चुकांसह वस्तूनिष्ठ आणि वैज्ञानिक माहितीच्याही असंख्य चुका !

पुस्तकात व्याकरणाच्या मूलभूत चुकांपासून चुकीची वैज्ञानिक माहिती देण्यापर्यंतच्या चुका असणे हे  गंभीर आणि लज्जास्पद आहे ! यावरून मंडळातील सदस्यांचा अक्षम्य निष्काळजीपणाच उघड होतो !

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ १ सहस्र ५०० भाविकांना दिला जाणार प्रवेश !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केवळ १ सहस्र ५०० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात केवळ १० दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शिल्लक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

साधारणपणे २ कोटी २० लाख डोस आपल्याला आवश्यक आहेत. येत्या ३ मासांत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. साधारण प्रती आठवड्याला २० लाख डोस आवश्यक आहेत.

(म्हणे) ‘इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना अनुदान न मिळाल्यास या शाळांतील पालक आणि विद्यार्थी ते सहन करणार नाहीत !’ – ‘फोर्स’ संघटना

भावी पिढीची अधोगती करणार्‍या इंग्रजाळलेल्या पालकांच्या ताकदीला भीक घालायची का ?  ते सरकारने ठरवावे !

राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचार्‍यांचा २ दिवस संप

बँकांच्या खासगीकरणामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना न्यूनतम कर्ज दिले जाईल.

बेळगाव येथे मराठी भाषिकांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ सावंतवाडीत धरणे आंदोलन

महाराष्ट्र एकीकरण समिती, सिंधुदुर्गच्या वतीने शिवाजी चौकात धरणे आंदोलन चालू करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी २४ मार्चला निवडणूक

जिल्हा परिषदेच्या पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.