म्हादईची पहाणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या पथकाला कर्नाटक पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक

कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांनी चोर्ला घाटापासून ते कळसा येथील म्हादई प्रकल्पापर्यंत पोलिसांना पहारा ठेवण्याचा आदेश दिला आहे.

डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदी २ वर्षे पूर्ण

तुमच्या सतत असलेल्या विश्‍वासामुळे गोवा स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मी अथक कार्य करीन आणि माझ्या मार्गात येणारी आव्हाने स्वीकारीन.

इलेक्ट्रिक बसगाड्या भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी कदंब वाहतूक महामंडळाकडून निविदा

कंदब महामंडळाकडून पुढच्या आठवड्यात ५० विजेवर चालणार्‍या बसगाड्या चालू करण्यात येतील.

वेळागर येथे होत असलेल्या ‘पॅरासिलिंग’च्या विरोधात मासेमारांचे काम बंद आंदोलन

केरवाडा येथील ६०० ते ७०० संतप्त मासेमारांनी १९ मार्चला मासेमारी व्यवसाय बंद ठेवून वेळागर येथे आंदोलन केले.

वैभववाडी तालुक्यातील अवैध सिलिका वाळू उत्खननाच्या विरोधात महसूल विभागाकडून कारवाई चालू

कासार्डेसहित तालुक्याच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात सिलिका मायनिंग चालू आहे.

संपूर्ण कोकण उद्ध्वस्त करणार्‍या नाणार प्रकल्पाला कोकणवासियांनी विरोध करावा ! – प्रा. महेंद्र नाटेकर, स्वतंत्र कोकण राज्य संघटना

कोकणचा विकास नको;पण ते भकास तरी करू नका !

पुरातत्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणाकडे लक्ष न दिल्यास शिवभक्तांना ते हटवावे लागेल ! – संभाजीराव भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

कोल्हापूर येथे पुरातत्व विभागाला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने १९ मार्च या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

सातारा येथील नारायण सारंगकर यांची पोलीस निरीक्षक पदावरून १ वर्षासाठी पदावनती !

वादग्रस्त ठरलेले शहर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे पोलीस विभागीय चौकशी अंतर्गत वेगवेगळ्या दोषारोपांपैकी ३ दोषारोपांमध्ये दोषी आढळून आले आहेत. यामुळे पोलीस महासंचालकांनी १ वर्षासाठी सारंगकर यांना पदावनतीची शिक्षा ठोठावली आहे.

पदावरून हटवण्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मौन

मनसुख हिरेन मृत्यू आणि स्फोटक प्रकरण यांवरून शरद पवार हे अनिल देशमुख यांच्यावर नाराज असून गृहमंत्रीपदावर जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे.

देशी बनावटीचे पिस्तूल आणि गावठी कट्टा यांची तस्करी करणार्‍यास अटक !

कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील रेल्वे फाटकाजवळ १६ मार्च या दिवशी गावठी कट्ट्यासह पिस्तुलाची तस्करी करणारे अभिजीत उपाख्य पप्पू लक्ष्मण मोरे यांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. मोरे यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.