पणजी, १९ मार्च (वार्ता.) – डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर २ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने कोरोना महामारीच्या काळात लोकांनी पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी लोकांचे आभार मानले आहेत.
Today as I complete 2 years as the Chief Minister of the state of Goa, I wish to express my heartfelt thanks to the loving people who have placed their trust in me. I am deeply honoured with the support I’ve felt through a difficult phase of pandemic to make Goa strong again.1/2 pic.twitter.com/UYA8wBkR0L
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 19, 2021
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘‘गोवा राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारून मला १९ मार्चला २ वर्षे पूर्ण होत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवणार्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो. कोरोना महामारीच्या काळात गोव्याची स्थिती बळकट करण्यासाठी मिळालेल्या पाठिंब्याचा मी आदर करतो. या सुंदर प्रवासात असलेल्या प्रत्येकाच्या निष्ठेची मी प्रशंसा करतो. तुमच्या सतत असलेल्या विश्वासामुळे गोवा स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मी अथक कार्य करीन आणि माझ्या मार्गात येणारी आव्हाने स्वीकारीन.’’