पुरातत्व विभागाला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे कोल्हापूर येथे घंटानाद आंदोलन
कोल्हापूर, १९ मार्च (वार्ता.) – ज्यांचा आदर्श आज जग घेत आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक गडावर आज अतिक्रमण होत आहे, तसेच गडही दुर्लक्षित आहेत. काही दिवसांपूर्वी भुदरगड येथील एका देवीच्या प्राचीन मंदिरासाठी ग्रामस्थांनी रस्ता बांधला होता. ‘ही जागा वनखात्याच्या कह्यात असल्याने अनुमती नाही’, असे कारण पुढे करून वनखात्याने हा रस्ता उखडून टाकला. या पुढील काळात पुरातत्व विभागाने अशीच तत्परता विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात दाखवावी. याकडे लक्ष न दिल्यास शिवभक्तांना ते हटवावे लागेल, अशी चेतावणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी दिली.
Posted by Hindu Janjagruti Samiti Sindhudurg on Friday, March 19, 2021
पुरातत्व विभागाला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने १९ मार्च या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी वरील चेतावणी दिली. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर ‘ऑनलाईन’ आंदोलनही करण्यात आले.