असे वासनांध राजकारणी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? अशा नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक

दौंड (जिल्हा पुणे) – येथील २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरुणीला आरोपी रघुनाथ कुचिक याने लग्नाचे आमीष दाखवून शिवाजीनगर आणि अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले. यामुळे पीडित तरुणी गरोदर राहिल्यावर तरुणीचा गर्भपात केला आणि याविषयी कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !