आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण !

  • कर्नाटकमधील लव्ह जिहादच्या घटनेविषयी जागृती केल्याचा परिणाम !

  • पंचवटी उपाहारगृहातील साहित्याची नासधूस

  • छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना !

  • अर्धा घंटा मारहाण करून जिवे मारण्यासाठी नेत होते !

यवतमाळ, २१ एप्रिल (वार्ता.) – सामाजिक माध्यमावर कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या लव्ह जिहादमधील हत्येच्या घटनेच्या संदर्भात ‘पोस्ट’ टाकल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते धारकरी आणि पंचवटी उपाहारगृहाचे मालक श्री. शिवम ढोले यांच्यावर २० एप्रिल या दिवशी मुबारकनगर परिसरातील (१५ ते २५ वयोगटातील) १५ ते २० धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले, तसेच उपाहारगृहातील साहित्याची नासधूस करून रोख ४७ सहस्र ६०० रुपये लुटले. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना केली आणि शिवरायांची मूर्ती फोडली !

श्री. ढोले यांना दुचाकीवरून बाबा कंबलपोश दर्ग्यासमोर आणून धर्मांधांनी अर्धा घंटा मारहाण केली. (हिंदूंनो, दर्ग्यासमोर काय घडते, ते लक्षात घ्या ! – संपादक) तेथून त्यांनी निसटण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा त्यांना दुचाकीवर बसवून टिपू सुलतान चौकीतील कोठी येथे जिवे मारण्यासाठी घेऊन जाऊ लागले. त्या वेळी माहूर चौकात सुदैवाने गाडीची गती न्यून झाल्याने श्री. ढोले यांनी गाडीवरून उडी मारून पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी धर्मांध जमावाच्या विरोधात तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त हिंदु समाजाने पोलीस ठाण्यात गोळा होऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

श्री. ढोले यांच्याजवळील पैसे, भ्रमणध्वनी धर्मांधांनी हिसकावले. यांच्या डोक्यावर, पाठीवर लोखंडी सळईने मारहाण केली. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

आरोपी शेख आशिफ, शेख सामु शेख मोहीब, शेख अनस, शिकोरी, कालू शेख, जाकीर सोलंकी, फयाज शेख यांच्यासह १३ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे, असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी २१ एप्रिल या दिवशी आर्णी येथील हिंदु समाजाने पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.  आर्णी शहरातील बाजारपेठ २१ एप्रिल या दिवशी बंद ठेवण्यात आली होती.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शिवम ढोले हे लव्ह जिहादच्या संदर्भात हिंदु मुली आणि पालक यांचे प्रबोधन करणे, तसेच मंदिरांविषयी जागृती करणे, असे कार्य करतात. यापूर्वी त्यांना सामाजिक माध्यमातून अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

  • या आक्रमणाचा अर्थ या धर्मांधांचा लव्ह जिहाद आणि हत्या करणार्‍या तरुणाला पाठिंबा आहे, असाच होतो. त्यामुळे या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
  • हिंदूंनो, आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा घ्या ! महाराष्ट्रातील सर्व हिंदुत्वनिष्ठांनी याविरोधात जागृती करायला हवी; कारण उद्या ही वेळ जागृती करणार्‍या प्रत्येक हिंदूवर येऊ शकते !
  • लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात हिंदु अपेक्षित संख्येने एकत्र येत नाहीत; धर्मांध मात्र त्याविरोधात जनजागृती करणार्‍या हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी एकत्र येतात, हे लक्षात घ्या !