नगर येथे भगवे ध्वज काढणे चालू
अहिल्यानगर – नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज काढण्याचे काम पोलीस प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून चालू झाले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी ‘भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी काय संबंध ?’, असा प्रश्न करत जिल्हाधिकार्यांना यासंबंधी निवेदन दिले आहे. भगवा ध्वज हिंदु धर्माचे प्रतीक आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षांशी बांधील नाही. त्यामुळे आचारसंहितेमधून भगवा ध्वज वगळण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. प्रशासन आणि निवडणूक संस्थेस तशा सूचना द्याव्यात, असे निवेदनात नमूद केले आहे. बापू ठाणगे यांनी हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मापारी यांना दिले आहे. या निवेदनावर बापू ठाणगे यांच्यासह दिगंबर गेंट्याल, भरत शिंदे, रूपेश वाळके, अनिकेत शिंदे, विशाल भागवत आदी धर्मप्रेमी धारकरी युवकांच्याही स्वाक्षर्या आहेत.