सातारा येथून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांचा नकार !

सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे सांगितले.

केजरीवालांची अटक पूर्णपणे चुकीची ! – शरद पवार

राज्याच्या प्रमुखाला अटक करणे आणि त्याने धोरणे ठरवली म्हणून त्यासाठी अटक करणे हे पूर्णपणे गैरवाजवी आहे, चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा १०० टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे, असे वक्तव्य बारामती दौर्‍यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केले.

EXCLUSIVE : महाराष्ट्रात केवळ १० पक्षांना मिळणार राखीव चिन्ह : ३७६ पक्षांना लढवावी लागणार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक !

शरद पवार यांच्या पक्षाची ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यताही गेली ! श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त असलेल्या केवळ १० पक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघांत राखीव चिन्ह मिळू शकेल. या व्यतिरिक्त ३७६ अमान्यताप्राप्त; परंतु नोंदणी असलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवायची असल्यास त्यांना मुक्तचिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, म्हणजेच … Read more

कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांची आमदार सुनील शेळके यांना धमकी !

शरद पवार यांच्या मेळाव्याला येऊ नये; म्हणून सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना दमदाटी केली होती. यावरून शरद पवार यांनी सुनील शेळके यांना चेतावणी देत सुनावले आहे.

जागावाटपाविषयी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा !

जागावाटपाविषयी ६ मार्च या दिवशी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीपूर्वी धोरणात्मक निर्णयाच्या दृष्टीने दोघांत चर्चा झाली.

थोडक्यात..

येथे मराठा आंदोलकांकडून रस्ता बंद आंदोलन करण्यात येत होते. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या वेळी काही आंदोलकांना हुसकावण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला.

छत्रपतींचे नाव घेतल्याने मुसलमानांची मते मिळणार नाहीत, असे पवारांना वाटायचे !

मी एका मुलाखतीत शरद पवार यांना ‘तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेता; पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही’ असे म्हटले होते. त्यावर त्यांनी मौन साधले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १० ते १२ वर्षांचा मुलगा दगड फोडतांना आढळला !; गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रक्कम जप्त; पण पोलीस तोतया असल्याचे उघड !…

भारतीय राज्यघटनेनुसार १४ वर्षांखालील मुला-मुलींना अल्प आर्थिक मोबदला देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून त्यांचा शैक्षणिक अधिकार हिसकावून त्यांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे हा कायद्याने गुन्हा असून यामध्ये कायद्यानुसार शिक्षेचे प्रावधान आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले हा सत्तेचा गैरवापर ! – शरद पवार, खासदार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले, हा सत्तेचा गैरवापर आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्याविषयी काहीच होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा, यासाठी माझ्यासह मल्लीकार्जुन खर्गे, डी. राजा, तसेच तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे

(म्हणे) ‘जाणकार व्यक्तीवर आक्रमण करण्याची झुंडशाही लोकांना न पटणारी !’ – शरद पवार

पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांना ‘देशाला दिशा देणारे आणि देशासाठी कष्ट करणारे’ म्हणून शरद पवार यांनी क्रांतीकारक अन् देशभक्त यांचा अवमानच केला आहे !