एकनाथ खडसे १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार !

छायाचित्र सौजन्य : सरकारनामा

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आणि नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ‘येत्या १५ दिवसांत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश सोहळा देहली येथे होणार आहे’, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मी कायमचा ऋणी राहीन. शरद पवार यांनी आपल्याला संकटकाळात साहाय्य केले. त्यामुळे त्यांना विसरणे अशक्य आहे; परंतु मला माझ्या मूळ पक्षात असले पाहिजे, अशी साद अनेक ज्येष्ठ नेत्यांनी घातली होती. त्यानंतर विचार करून मी हा निर्णय घेतला आहे.