(म्हणे) ‘मुलांच्या डोक्यात काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे, हे कळत नाही !’

‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमात मनाचे श्‍लोक आणि मनुस्मृति यांचा समावेश करण्यावरून शरद पवार यांना पोटशूळ !

मुंबई – मनस्मृतीचा अभ्यास करण्याच्या प्रकरणी या सरकारची मानसिकता काय आहे, हे लक्षात येते. याविषयी आग्रही भूमिका आम्हाला घ्यावीच लागेल. शिक्षणक्षेत्रातील जाणकारांनी याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, अन्यथा  प्रादेशिक संस्था स्वस्थ बसणार नाहीत. मुलांच्या डोक्यात नेमके काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे, हे कळत नाही, अशा शब्दांत अभ्यासक्रमात मनस्मृति आणि मनाचे श्‍लोक यांचा समावेश करण्याच्या सूत्रावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप घेतला.


२४ मे या दिवशी यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ‘राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या) अभ्यासक्रमात मनस्मृति आणि मनाचे श्‍लोक यांचा समावेश करण्यात येणार असल्याविषयीचा प्रश्‍न शरद पवार यांना प्रश्‍न विचारला. त्यावर त्यांनी वरील विधान केले. या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृति आणि मनाचे श्‍लोक समाविष्ट करण्याचा विचार चालू असल्याची गोष्ट माझ्या कानावर आली आहे. यावरून राज्यशासनाची राज्यघटनेविषयीची काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. सामाजिक संस्थांनी याची नोंद घेतली पाहिजे.’’

संपादकीय भूमिका

  • शिक्षणाच्या नावाखाली अनेक मदरशांतील मुलांच्या डोक्यात काय घातले जाते ?, असा प्रश्‍न कधी शरद पवार यांना पडला का ?
  • स्वार्थी आणि दूषित राजकारणामुळे नव्हे, तर केवळ हिंदु धर्मामुळे समाजातील नैतिकता टिकून आहे. ‘हिंदु धर्माचे ज्ञान मिळाल्यावर भावी पिढी तेजस्वी आणि धर्माभिमानी बनेल अन् स्वत:ची राजकीय पोळी भाजणार्‍यांची दुकाने बंद होतील’, अशी तर भीती राजकारण्यांना वाटत नाही ना ?