Dabholkar Murder Case Verdict : (म्हणे) ‘मुख्य सूत्रधारासाठी राज्य सरकारने अपील करावे !’ – शरद पवार

कथित पुरोगामी राजकारण्यांचे नेहमीचेच रडगाणे !

शरद पवार

पुणे, १० मे (वार्ता.) – दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाच्या निकालाला इतकी वषे लागल्याने आम्ही अस्वस्थ होतो. किमान काही तरी निकाल मिळाला. दाभोलकर यांच्या आत्म्याला काहीतरी न्याय मिळावा. मारेकर्‍यांना शिक्षा झाली असली, तरी मुख्य सूत्रधार सुटला. त्यासाठी राज्य सरकारने अपील करावे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.  (हिंदु आतंकवादाचे मिथक समाजमनावर रुजवण्यात पवार आघाडीवर होते. न्यायालयाच्या निकालाने हे मिथक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे पवार हिंदूंची क्षमा मागणार का ? जबाब दो ! – संपादक)  

(म्हणे) ‘पुन्हा एकदा विवेकी विचारांची कास धरायला हवी !’ – जितेंद्र आव्हाड, शरद पवार गटाचे नेते

जितेंद्र आव्हाड

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तब्बल ११ वर्षांनंतर लागलेल्या निकालाचे स्वागत ! दाभोलकर कुटुंबीय आणि अंनिसचेे सर्व कार्यकर्ते यांनी संयमितपणे दिलेल्या लढ्याचा अभिमान वाटतो ! आज संपूर्ण देश जुमले, भूलथापा आणि उसन्या धार्मिक दिखाव्याला कंटाळला असून पुन्हा एकदा विवेकी विचारांची कास धरण्याच्या मार्गावर आहे. काही माथेफिरू लोकांनी डॉ. दाभोलकर यांना संपवले; पण ते त्यांचे विचार संपवू शकले नाहीत. विवेकाचा आवाज बुलुंद होवो ! (गुंड वर्तन करणार्‍या राजकारण्यांनी विवेकाची भाषा वापरणे हाच मोठा विनोद ! – संपादक)  

(म्हणे) ‘मास्टरमाईंड’नाही शिक्षा होणे आवश्यक !’ – आमदार रोहित पवार, शरद पवार गट

रोहित पवार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायालयाचे आभार ! परंतु काही आरोपी यातून निर्दोष सुटल्याने त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारला अपयश आलं, याचे दुःख होते. यासोबतच आरोपींना शिक्षा होणेही आवश्यक आहेच; पण या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ हे मात्र नामानिराळे राहिले आहेत. त्यांच्या मुसक्या आवळून कायद्याने त्यांनाही शिक्षा होणे आवश्यक आहे. (दाभोलकर प्रकरणाचा मास्टरमाईंड काळाच्या ओघात पुढे येईलच; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले. त्याचा मास्टरमाईंड कोण आहे ?’, हे जाणून घेण्यात जनता उत्सूक आहे ! – संपादक)

निकालाविषयी असाही जातीयवादी सूर !

निकालाविषयी सामाजिक माध्यमांमध्ये निर्दोष सुटलेले आणि दोषी सिद्ध झालेले यांच्याविषयी काही गटांमध्ये चर्चा करण्यात येत होती. यामध्ये निर्दोष सुटलेले हे उच्चवर्णीय आहेत, तर दोषी सिद्ध झालेले बहुजन समाजातील आहे. बहुजन समाजातील व्यक्तींचा उपयोग केला जातो आणि त्यांना अडकवले जाते, अशा जातीयवादी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.