विहिरीत पडलेल्या गायीची कल्याण अग्नीशमन दलाच्या प्रयत्नाने सुटका !

३६ फूट खोल विहिरीत पडलेल्या गायीची कल्याण अग्नीशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करीत सुखरूप सुटका केली. कल्याण पश्‍चिमेतील रामारुति मंदिर परिसरात हा प्रकार घडला.

मुंबईमध्ये मुंबादेवी आणि महालक्ष्मी या मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलिसांची नेमणूक

मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या कालावधीत लक्षावधी भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

वेतनवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल आस्थापनाच्या सुरक्षारक्षकांचा संप

महाराष्ट्र सुरक्षा बल आस्थापनाचे सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत. मेट्रो, विमानतळ, पथकर नाका, टाटा रुग्णालय, मोनो रेल यांसारख्या अनेक ठिकाणी हे आस्थापन सुरक्षा पुरवते.

बंगालमध्ये गो-तस्करांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या

बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यामधील बांगलादेशच्या सीमेवर गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या केली. सैनिकाने गईघाटा येथे गोतस्करांचा ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याची हत्या करण्यात आली.

कर्नाटक राज्यामध्ये अनेक विचारवंतांना पोलीस सुरक्षा

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटकातील १८ लेखक आणि विचारवंत यांना संरक्षण देण्याची शिफारस राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने अभिनेता गिरीश कर्नाड यांच्यासह बंगारू रामचंद्रप्पा, पाटील पुट्टप्पा, चन्नवीरा कनावी यांच्यासह अनेकांना पोलीस संरक्षण दिले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह महापौर आणि आयुक्त यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी २ कोटी ७३ लाख रुपये व्यय

पालिका मुख्यालयासह महापौर आणि आयुक्त यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी २ कोटी ७३ लाख रुपये व्यय येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या मंजुरीसाठी आणला होता.


Multi Language |Offline reading | PDF