काश्मीरमध्ये दोन आतंकवादी ठार

प्रतीकात्मक छायाचित्र

अवंतीपोरा (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी दोघा आतंकवाद्यांना चकमकीत ठार मारले. हे दोघे आतंकवादी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचे आहेत. यातील एकाची ओळख पटली असून त्याचे नाव कैसर कोका आहे. तो वर्ष २०१८ पासून काश्मीरमधील तरुणांची दिशाभूल करून आणि आमीष दाखवून आतंकवादी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करत होता.

संपादकीय भूमिका

आणखी किती आतंकवाद्यांना ठार मारल्यानंतर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपणार आहे ?