नाशिक येथे बंदीवानांनी कारागृह सुरक्षारक्षकाला दगडाने मारले !

नाशिक – येथील मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहातून आलेल्या बंदीवानांकडून येथील कारागृह सुरक्षारकाला दगडाने मारण्यात आले. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खुनाची शिक्षा भोगणार्‍या १० ते १२ बंदीवानांनी सकाळी अचानकपणे त्यांचे बॅरेक विनाअनुमती पालटले. या वेळी कर्तव्यावर असलेले कारागृह सुरक्षारक्षक पाटील यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी बंदीवानांकडे याविषयी विचारणा केली. त्याचा राग मनात धरून बंदीवानांनी पाटील यांना दगडाने मारहाण केली. त्यांना तातडीने कारागृह व्यवस्थापनाकडून खासगी रुग्णालयात हालवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका 

कारागृहातच असे आक्रमण होत असेल, तर राज्यातील अन्य ठिकाणच्या कायदा-सुव्यवस्थेचा विचारच न केलेला बरा !